स्वारगेट अत्याचाराला वेगळे वळण? रुपाली ठोंबरे म्हणाल्या, संबंध संमतीने…
सध्या राज्यभर वादंग उठले असून, पोलिस तपास सुरू आहे

पुणे/सहदेव खांडेकर : स्वारगेट बस स्थानकावरील शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आला. या प्रकरणात नवीन वादळी खुलासे समोर आले आहेत. आरोपी दत्ता गाडे याच्या वकिलांनी हा बलात्कार नसून दोघांमध्ये संमतीने संबंध प्रस्थापित झाले होते असा दावा केला आहे. यावरून संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, या घटनेने समाजमन अस्वस्थ झाले आहे.
रुपाली ठोंबरेंचा धक्कादायक खुलासा म्हणाल्या,
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) प्रदेश प्रवक्त्या रुपाली ठोंबरे यांनी या प्रकरणावर मोठा दावा केला आहे. त्यांनी फेसबुक पोस्ट करत सांगितले की, हे संबंध संमतीने झाले होते, मात्र व्यवहाराचे पैसे न दिल्याने वाद निर्माण झाला आणि पुणे शहराला नाहक बदनाम केलं जात आहे.ठोंबरेंच्या या वक्तव्यामुळे प्रकरणाला नवीन वळण लागले असून, अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत.
DCP गिल यांच्याशी झालेला संवाद
रुपाली ठोंबरेंनी दावा केला की, जेव्हा आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले, तेव्हा DCP गिल यांनी त्यांच्याशी संवाद साधला. पोलिसांनी त्यांना विचारले, मॅडम, तुम्ही आंदोलन करणार असाल किंवा आरोपीला काळे फासणार असाल, तर कृपया तसे करू नका.
त्यावर ठोंबरेंनी उत्तर दिले, मी कोणत्याही चुकीच्या प्रकरणावर आंदोलन करणार नाही. संपूर्ण माहिती घेऊनच माझी भूमिका मांडेन.
प्रकरणाचा पुढील तपास सुरू
या प्रकरणावरून सध्या राज्यभर वादंग उठले असून, पोलिस तपास सुरू आहे. आरोपीच्या वकिलांच्या दाव्यांमुळे हा खरोखरच बलात्कार होता की संमतीने संबंध झाले होते, यावर आता संशय व्यक्त केला जात आहे.
पोलिस तपासानंतरच या प्रकरणाचा खरा गहाणार्थ स्पष्ट होईल, पण सध्या संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे.