महाराष्ट्रसांगोला

श्री गजानन लीला चॅरिटेबल ट्रस्टचे कार्य कौतुकास्पद : ना गणेश नाईक

मा.आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील यांच्या हस्ते समाजभूषण पुरस्काराचे वितरण


सांगोला/विशेष प्रतिनिधी : मुंबई आणि नवी मुंबई परिसरातील आदिवासी, शोषित, पीडित, अंध, अपंग आणि अनाथ विद्यार्थ्यांच्या पुनर्वसनासाठी काम करणाऱ्या श्री गजानन लीला चॅरिटेबल ट्रस्ट या सामाजिक संस्थेचे कार्य अत्यंत कौतुकास्पद असून या संस्थेने अनेक निराधार यांना आधार दिला असल्याचे प्रतिपादन राज्याचे वनमंत्री गणेशजी नाईक यांनी केले. श्री गजानन लीला चॅरिटेबल ट्रस्टचा वर्धापन दिन 26 फेब्रुवारी रोजी नेरूळ, मुंबई येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे वनमंत्री गणेश नाईक आणि माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील उपस्थित होते. संस्थेचे सामाजिक कार्य पाहून वनमंत्री गणेश नाईक साहेब यांनी संस्थेला १० लाख रुपयांची देणगी जाहीर केली.

यावेळी श्री गजानन लीला चॅरिटेबल ट्रस्ट या सामाजिक संस्थेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या समाजभूषण पुरस्काराचे वितरण माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी असलेल्या माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी श्री गजानन लीला चॅरिटेबल ट्रस्ट संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब देशमुख व सचिव जगदीश जाधव यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. आदिवासी पाड्यात जाऊन समाजातील निराधार लोकांसाठी पुढाकार घेऊन आपण करत असलेले कार्य आदर्श असेच आहे. विशेषतः आदिवासी पाड्यातील निराधारांच्या मुलांना एकत्रित करून त्यांना दर्जेदार शिक्षण देणे आणि अशा मुलांना स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी ही संस्था अनेक वर्षांपासून प्रयत्न करीत आहे. समाजात अशा सेवाभावी संस्थांची आणि व्यक्तींची गरज आहे. प्रत्येकाने आपली सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन काम केल्यास समाजात एकही निराधार अनाथ अपंग आणि वंचित विद्यार्थी शिक्षणापासून आणि आपल्या हक्कापासून वंचित राहणार नाही असेही शेवटी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी नमूद केले.

संस्थेने आधार दिलेला विद्यार्थी बनला सी.ए.

श्री गजानन लीला चॅरिटेबल ट्रस्ट या ट्रस्टने आधार दिलेला आदिवासी पाड्यातील विद्यार्थी शिक्षण घेऊन सी. ए. बनला या विद्यार्थ्याकडे पाहून संस्थेने आधार दिलेले अन्य विद्यार्थी प्रेरणा घेतील असा विश्वास व्यक्त करून मंत्री गणेश नाईक आणि माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या हस्ते सी ए झालेल्या संस्थेच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button