महाबोधी महाविहार मुक्तीसाठी वंचित बहुजन आघाडीचे तहसीलदारांना निवेदन
1949 च्या व्यवस्थापन कायद्यात सुधारणा करून महाबोधी महाविहाराचे स्वामित्व बौद्ध भिक्षूंकडे सोपवावे अशी मागणी करण्यात आली

मंगळवेढा/विशेष प्रतिनिधी : बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराच्या संपूर्ण व्यवस्थापनाची जबाबदारी बौद्ध समाजाकडे द्यावी, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. 1949 च्या व्यवस्थापन कायद्यात सुधारणा करून महाबोधी महाविहाराचे स्वामित्व बौद्ध भिक्षूंकडे सोपवावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली.
महाबोधी महाविहार हे जागतिक धम्म प्रेरणास्थान असूनही काही कर्मठ लोकांनी हे पवित्र स्थळ बौद्ध समाजाच्या ताब्यात जाण्यापासून रोखले आहे. त्यामुळे सदर व्यवस्थापन काढून ते बौद्ध भिक्षूकडे सोपवण्यात यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली. भारत सरकार व बिहार राज्य शासनानेही यावर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली.
या वेळी वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष अशोक माने यांच्या हस्ते तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या कार्यक्रमाला महासचिव अनंता वाघमारे, जिल्हा उपाध्यक्ष वैभव भंडारे, भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष विठ्ठल सरवदे, प्रसिद्धी प्रमुख संभाजी कांबळे, अंकुश शेवडे, रामचंद्र होवाळे, शिवशरण गुरुजी, सत्यवान मोरे, हरी वाघमारे, शंकर माने आदी कार्यकर्ते उपस्थित होते. महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला मंगळवेढा तालुका वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा असून, या मागण्या त्वरित मान्य कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.