
सांगोला/विशेष प्रतिनिधी : शिवप्रेमी तरुण मंडळ यांनी शिवजयंतीचे औचित्य साधून बार्शी येथील शस्त्र संग्रहक माधवराव देशमुख यांचे एकविराई मर्दानी आखाडा यांचे शिवकालीन शस्त्राचे 2 दिवस प्रदर्शन आयोजित केले होते.याप्रदर्शनामध्ये सांगोला महाविद्यालयातील इतिहास विभागातील विद्यार्थ्यांनी भेट देऊन शिवकालीन विविध शस्त्रांची माहिती जाणून घेतली. यामध्ये विविध प्रकारच्या तलवारी, पट्टा, दांडपट्टा, ढाल, वाघनखे,बिचवा, कट्यार, फरशा, गोफण, बाण, गोळे, जाळीचे चिलखत,चावी किल्ली, मराठा ढाल कासवाच्या पाठीचा,राजाराणी खंजीर, त्रिमुखी खंजीर चंद्रभान, कट्यारी, पट्टा आणि दांडपट्टा तसेच छुपे शस्त्र : चिलामन, बिछवा कटार आणि कुकरी अशा दुर्मिळ शस्त्राचे प्रदर्शन सांगोला येथे भरवण्यात आले होते.
सांगोला महाविद्यालयात कायदेविषयक विधीज्ञ संघ व विधी सेवा समिती मार्फत मार्गदर्शन शिबिर
या प्रदर्शानामध्ये गडकिल्ल्यांचे माहिती पत्रक देखील लावण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आजच्या विद्यार्थ्यांनी विसरू नये. महाराजांच्या इतिहासाची, त्यांच्या गनिमी काव्यांची, दूरदृष्टीची आणि शरीराने बलदंड असलेले त्यांचे सरदार मावळे हे कशाप्रकारे तत्कालीन शस्त्र हाताळत होते याची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना राहावी या उद्देशाने हे शस्त्र प्रदर्शनासभेट देण्यात आली. प्रदर्शनात मांडलेल्या शिवकालीन प्रत्येक शास्त्राची माहिती शस्त्र संग्रहक माधवराव देशमुख यांचेकडून देण्यात आली. मोबाईल इंटरनेटच्या जमान्यात शरीर कमावून देणारे मर्दानी खेळ जसे दुर्लक्षित होते गेले. तसेच युध्दकला आणि शस्त्रांशी असलेले नातेही पुसट होत आहे.
इतिहास अभ्यासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असेलेल्या साधनामधून शिवकालीन शस्त्रांची पाहणी करून, प्रदर्शन भेटीतून इतिहासाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. सदरील शैक्षणिक सहल महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली विभागप्रमुख डॉ.सदाशिव देवकर आणि डॉ.महेश घाडगे यांनी यशस्वी केली