शैक्षणिकमहाराष्ट्र

सिंहगड महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना बीएनवाय मेलन, पुणे येथे मार्गदर्शन सत्रामध्ये संधी

उद्योगातील नव्या ट्रेंड्स, करिअरच्या संधी आणि व्यावसायिक नेटवर्किंगचा अनमोल अनुभव  विद्यार्थ्यांना मिळाला


पंढरपूर/ हेमा हिरासकर : पंढरपूर सिंहगड महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना बीएनवाय मेलन, पुणे येथे करीयर मार्गदर्शन सत्रामध्ये  मध्ये सहभागी होण्याची संधी मिळाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.कैलाश करांडे यांनी दिली. हे सत्र दिनांक 12 फेब्रुवारी 2025 रोजी आयटी पार्क, खराडी, पुणे, येथे आयोजित करण्यात आले होते.

हे सत्र अत्यंत समृद्ध आणि ज्ञानवर्धक होते, ज्यामध्ये उद्योगातील नव्या ट्रेंड्स, करिअरच्या संधी आणि व्यावसायिक नेटवर्किंगचा अनमोल अनुभव  विद्यार्थ्यांना मिळाला. या कार्यक्रमाचा भाग होण्यासाठी बीएनवाय मेलन द्वारे एक ऑनलाइन टेस्ट घेण्यात आली होती. यामधून  एसकेएन कॉलेज ऑफ इंजिनियरींग, पंढरपूर मधील प्रथम व द्वितीय वर्षातील एकूण  6 विद्यार्थी ( कुलदीप गोडसे ,  प्रथमेश शिंदे , राजेश्वरी अंगडी , वैशाली चव्हाण,  स्नेहल नलवडे, स्वप्नील माळी ) निवडले गेले. 

PM Modi : चहाच्या सुगंधाला चहा विक्रेत्याइतकं कोण ओळखू शकत : पंतप्रधान मोदी

या मार्गदर्शन सत्रांमध्ये कंपनीच्या वरीष्ठ पदाधिका-यांनी बीएनवाय मेलन मध्ये विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या इंर्टनशिप, कँम्पस प्लेसमेंट प्रक्रिया, कंपनीला आवश्यक असलेले कौशल्य या विषयावर मार्गदर्शन केले. ही संपूर्ण अनुभवप्रक्रिया विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरली. 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button