सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये “इमर्जिंग ट्रेंडस इन इंडस्ट्रीयल इन्स्ट्रूमेंटेशन” व्याख्यान सत्र
"इमर्जिंग ट्रेंडस इन इंडस्ट्रियल इन्स्ट्रुमेंटेशन" या विषयावर द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी तज्ज्ञ व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले

पंढरपूर/ हेमा हिरासकर : एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभाग आणि इनोवेशन क्लब (IC) यांच्या संयुक्त विद्यमाने “इमर्जिंग ट्रेंडस इन इंडस्ट्रियल इन्स्ट्रुमेंटेशन” या विषयावर द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी तज्ज्ञ व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
हे व्याख्यान प्रा. ए. ए. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. यामध्ये प्रा. जोशी यांनी विद्यार्थ्यांना औद्योगिक मापन आणि नियंत्रण प्रणालींमध्ये उदयास येणाऱ्या नवीन तंत्रज्ञानाची माहिती दिली. तसेच ॲटोमेशन, सेन्सर तंत्रज्ञान, IoT आणि AI च्या औद्योगिक उपयोगांवर सखोल चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपले प्रश्न विचारून प्रा. जोशी यांच्याकडून सखोल मार्गदर्शन घेतले.
या कार्यक्रमात ७० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. व्याख्यानाच्या यशस्वी आयोजनाबद्दल विभाग प्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी यांनी समाधान व्यक्त केले आणि हे ज्ञान विद्यार्थ्यांच्या भविष्यात उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच प्रा. स्वप्निल टाकळे, प्रा. राहुल घोडके यांनी विशेष योगदान दिले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार सानिका बाबर यांनी मानले.