Maharashtra All 29 Municipal Corporation Result 2026
मुंबई : मुंबई कोणाची हे लवकरच निकालात समजेल. मुंबई ही ठाकरे बंधूकडे राहणार का ? की जाणार भाजपकडे? पाहा सर्व update आपल्या IN Public News वर…LIVE | Maharashtra Municipal Elections Result | BMC | PMC Nikal | Maharashtra News | Marathi News 24*7
राज्यातील महापालिकांसाठी झालेल्या निवडणुकांचा आज निकालाचा दिवस आहे. काल शांततेत पार पडलेल्या मतदानानंतर आज सकाळपासून राज्यभरात मतमोजणीला सुरुवात झाली असून हळूहळू निकाल स्पष्ट होत आहेत.
राजकीय वर्तुळाचे लक्ष आता एका प्रश्नावर केंद्रीत झाले आहे—कोणत्या महापालिकेत कोणाची सत्ता आणि कुणाच्या गळ्यात महापौरपदाची माळ?
मुंबई वगळता राज्यातील इतर सर्व महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचना आहे. बहुतांश प्रभाग 4 सदस्यीय, तर काही प्रभाग 3 किंवा 5 सदस्यीय आहेत. त्यामुळे निकालांमध्ये आघाडी–युतींची गणिते महत्त्वाची ठरणार आहेत.
राज्यातल्या 29 महापालिकांसाठी काल मतदान झाल्यावर आज सर्वत्र मतमोजणी सुरु असून निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई वगळता राज्यातल्या इतर सर्व महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचना आहे. बहुतांश प्रभाग हे 4 सदस्यीय असून काही प्रभाग 3 किंवा 5 सदस्यीय आहे. हाती आलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत 52.94 टक्के, ठाणे मनपात 56 टक्के, पुणे मनपात 52 टक्के, पिंपरी चिंचवडमध्ये 58 टक्के, नवी मुंबईत 57 टक्के, नाशिक मनपात 57 टक्के मतदान झालंय. परभणीत 66 टक्के, जालन्यात 61 टक्के मतदान झालंय.
