स्वतःचं ठेवलं झाकून लोकांचे बघतात वाकून वाकून! सांगोल्यातील या संस्थेत नेमकं सुरू तरी काय?
विशेष प्रतिनिधी : सांगोला शहरातील न्यू इंग्लिश स्कूल, ज्युनियर कॉलेज व डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय KG to PG शिक्षण, पण वास्तव चक्रावणार! शिक्षणाचं पवित्र मंदिर म्हणवणाऱ्या या संस्थेत सध्या अभ्यासाऐवजी आरोप-प्रत्यारोप, शिस्तीऐवजी हाणामारी, तोंडाला काळे फासणे आणि आदर्शाऐवजी अराजकता यांचाच बोलबाला सुरू असल्याचं चित्र समोर येत आहे असे बोलले जात आहे.
अध्यक्षांनी KG ते PG आणि YCM सुरू करून सुविधा वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण या विस्तारामागे विद्यार्थ्यां ची गुणवत्ता केंद्रस्थानी आहे का? अध्यक्ष नव्या उपक्रमांसाठी धडपडत असताना, सचिव मात्र संस्था बुडवण्याच्या दिशेने पावलं टाकत असल्याचा गंभीर आरोप केला जात आहे.
बोगस शिक्षक भरती, विद्यार्थ्यांची लूट, आणि त्यावर कडी म्हणून हाणामारी!
इतकंच नाही तर शिक्षकांमध्ये दमदाटी करून सह्या घेणे, कायद्याचा धाक, काही शिक्षकांना स्वतःच आयुष्य जगताना आपण काय चुकलो काय करतोय का लाखोंचा पगार घेतोय हे विसरून खोट्या गोष्टी पसरवण्यासाठी जणू ठेकाच घेतला आहे? यातून चाटुगिरी करत प्रतिमा वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी संस्थेचं नुकसान होत असतानाही हातावर हात ठेवून बसणं ही जबाबदारी टाळण्याची पळवाट नाही का? असे सवाल पालकांनी केले आहेत.
“स्वतःचं ठेवलं झाकून लोकांचं बघतात वाकून-वाकून!”
आता संस्थेच्या कारभारावर तंतोतंत हे लागू होत असल्याचं पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून खुलेपणाने बोललं जात आहे. दिवसेंदिवस नवनवे धक्कादायक खुलासे समोर येत असताना, शिक्षणापेक्षा इतरच गोष्टींना अधिक महत्त्व दिलं जातंय का? असा थेट सवाल पालकांनी केला आहे.
संस्थेचे सचिव सकाळपासून संध्याकाळपर्यंत संस्थेत उपस्थित असतात, मात्र त्यांच्या उपस्थितीतच विद्यार्थ्यांना मारहाण, शिक्षकांमध्ये परस्पर हाणामारीचे प्रकार घडले आहेत. यावर व्यवस्थापनाची भूमिका नेमकी काय? “ज्ञानमंदिर चालवायचं आहे की संस्थेची बदनामीगेटवर टांगून ठेवतात?” असा संतप्त सवाल पालकांनी उपस्थित केला आहे.
संस्थेतील काही शिक्षकांनीच इन पब्लिक न्यूजशी बोलताना खंत व्यक्त केली आहे.
“इथे शिकवण्यापेक्षा काड्या करणं जास्त चालतं!”यासाठी सरकार लाखोंचा पगार देत आहे का? असा सवाल त्यांनी केला. ही स्थिती बदलायची असेल, तर अध्यक्षांनी तातडीने लक्ष घालून गुणवत्ता, शिस्त आणि पारदर्शकता टिकवण्यासाठी कठोर पावलं उचलण्याची गरज असल्याचं मत व्यक्त करत लवकरच अध्यक्ष मार्ग काढतील अशी आशा केली आहे.
शेवटी प्रश्न एकच
ही संस्था विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणारं ज्ञानमंदिर राहणार, की मारामाऱ्या आणि स्वार्थाचं अड्डा बनणार? लवकरच उत्तर अध्यक्षांनी द्यावे अशी मागणी करण्यात येत आहे.
अर्रर्र… चर्चा तर होणारच! “फोटो साधा, पण संदेश मोठा!” डॉ. अनिकेत देशमुखांनी दिल्या भावाला खास वाढदिवस शुभेच्छा!
