MahakumbhMela 2025 : महाकुंभमेळ्यातील महिलांचे स्नान चोरून चित्रीकरण; सांगली-लातूरमधील तरुण अटकेत
गुजरात पोलिसांची कारवाई : महाराष्ट्रातील दोन तरुण ताब्यात
Rohit Hegade3 weeks agoLast Updated: February 23, 2025
0 1 minute read
MahakumbhMela 2025
इन पब्लिक न्यूज : महाकुंभमेळ्यात (MahakumbhMela 2025 ) स्नान करणाऱ्या महिलांचे व्हिडिओ चोरीने शूट करून डार्क वेबवर विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यापैकी दोन आरोपी महाराष्ट्रातील सांगली आणि लातूर जिल्ह्यांतील आहेत.
गुजरात पोलिसांची कारवाई : महाराष्ट्रातील दोन तरुण ताब्यात
या प्रकरणात सांगली जिल्ह्यातील प्राज पाटील आणि लातूर जिल्ह्यातील प्रज्वल तेली यांना अटक करण्यात आली आहे. गुजरात पोलिसांनी सांगलीतील शिराळा येथे छापा टाकून प्राज पाटीलला ताब्यात घेतले, तर लातूरमधून प्रज्वल तेलीला अटक करण्यात आली.
प्रज्वल तेली परदेशी हॅकर्सच्या संपर्कात होता आणि पैशांच्या देवाणघेवाणीसाठी वेगवेगळ्या डिजिटल माध्यमांचा वापर करत होता, अशी माहिती समोर आली आहे. तिसरा आरोपी प्रयागराज येथील चंद्रप्रकाश फुलचंद आहे.
प्राज पाटील आणि प्रज्वल तेली यांनी महाकुंभमेळ्यात महिलांचे स्नान करतानाचे अर्धनग्न व्हिडिओ गुपचूप शूट करून डार्क वेबवर पोस्ट केले. याशिवाय, गुजरात आणि महाराष्ट्रातील हॉस्पिटल, मॉल यांसारख्या सार्वजनिक ठिकाणीही त्यांनी महिलांचे व्हिडिओ शूट केले.
ते टेलिग्रामवर वेगवेगळे अकाउंट तयार करून, त्याचे सदस्यत्व 2000 ते 4000 मध्ये विकत होते आणि या व्हिडिओंव्दारे पैसे कमवत होते.
१३ ठिकाणी एफआयआर दाखल
या प्रकरणात गुजरात आणि प्रयागराजमध्ये २ एफआयआर नोंदवले गेले असून, एकूण १३ एफआयआर दाखल झाल्याची माहिती आहे.
याआधी गुजरातमधील राजकोटच्या महिला रुग्णालयातील अशाच प्रकारचा व्हिडिओ समोर आला होता, ज्यावर पोलिसांनी कारवाई केली होती.
पोलीस तपास सुरू
या गोरखधंद्यात परदेशातूनही आर्थिक व्यवहार झाल्याची शक्यता आहे. गुजरात पोलिसांनी लातूरमधील आरोपी प्रज्वल तेलीचा विदेशी आर्थिक व्यवहाराचा तपास सुरू केला आहे.
तपास यंत्रणांनी डार्क वेब आणि टेलिग्रामवरील अशा अवैध ग्रुप्सवर कडक कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
या प्रकारामुळे महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला असून, पोलीस आणि सायबर सेल हे रॅकेट उघडकीस आणण्यासाठी अधिक तपास करत आहेत.
Rohit Hegade3 weeks agoLast Updated: February 23, 2025