विशेष प्रतिनिधी : सांगोला तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल, ज्युनिअर कॉलेज व डॉक्टर गणपतराव देशमुख महाविद्यालयात पुन्हा एकदा अतिशय धक्कादायक व संतापजनक प्रकार समोर आला असून संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
शाळेच्या पूर्णपणे भंगार अवस्थेतील स्कूल बसेस वापरून चक्क विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा गंभीर आरोप पालकांकडून करण्यात येत आहे. फिटनेस व इन्शुरन्स संपलेल्या बसेस, आरटीओच्या सर्व नियमांना केराची टोपली दाखवत, कचाकच विद्यार्थ्यांनी भरून रस्त्यावर धाववल्या जात आहेत, हे वास्तव उघड झाल्याने पालकांमध्ये प्रचंड संताप उसळला आहे. संस्थेच्या गचाळ कारभारावर बहिष्कार टाकण्याची चर्चा आता उघडपणे सुरू झाली आहे.
VAHAN portal – Parivahan : शासनाची वेबसाईट वर आपल्याला चेक करता येईल
जबाबदारी सचिव घेणार का? उच्च शिकलेले अध्यक्ष असेच हातावर हात ठेऊन बगत बसणार आहेत का?
प्रत्यक्ष बसची अवस्था पाहिली असता, ब्रेक लाईट चुराडा, मागील वाहनाला ब्रेक लावल्याचा इशाराच नाही! अचानक वळण घेताना किंवा आपत्कालीन ब्रेक लागल्यास भीषण अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. अशा अवस्थेत एखादी दुर्घटना घडली असती तर जबाबदारी सचिव घेणार का? की उच्च शिकलेले अध्यक्ष असेच हातावर हात ठेऊन बगत बसणार आहेत? असा थेट सवाल जनतेतून उपस्थित होत आहे.

या सगळ्या प्रकारामुळे आणखी एक गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. उच्च शिक्षण घेतलेल्या शिक्षकांना तरी विद्यार्थ्यांची किंमत आहे का? शासन लाखोंचा पगार देत असताना, शिकवणूक आणि विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणं सोडून घाणेरडं राजकारण व लोकांच्या विरोधात कारस्थानं करण्यावरच लक्ष आहे का? विद्यार्थ्यांच्या जीवासाठी आणि हितासाठी काम करणं हेच पहिले कर्तव्य आहे, हे या व्यवस्थेला विसरायला झालं आहे का?

“ज्या कामासाठी इथे आहात, तेच काम करा! विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणारे उद्योग तात्काळ बंद करा,” अशी संतप्त प्रतिक्रिया जनतेतून व्यक्त होत आहे. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन कडक चौकशी, आरटीओ कारवाई आणि दोषींवर कठोर शिक्षा करावी, अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही पालकांनी दिला आहे.

विद्यार्थ्यांचा जीव खेळण्याची वस्तू नाही!
हा जीवघेणा प्रकार थांबणार का, की एखाद्या दुर्घटनेनंतरच जाग येणार—हा प्रश्न आज संपूर्ण सांगोल्यात घुमतो आहे.


