विशेष प्रतिनिधी : सांगोला तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल, ज्युनिअर कॉलेज व डॉक्टर गणपतराव देशमुख महाविद्यालयात धक्कादायक प्रकार उघड! विद्यार्थ्यांच्या जीविताशी खेळ सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर येताच पालकांमध्ये प्रचंड संताप उसळला आहे. संस्थेवर बहिष्कार टाकण्याची चर्चा सध्या जोर धरू लागली असून शिक्षणसंस्थेच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.येतून पुढे मुलांना या शाळेत प्रवेश का घ्यावा असा सवाल पालकांनी केला आहे?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संस्थेचे अध्यक्ष स्वतः डॉक्टरकीचे शिक्षण घेतलेले असताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे अक्षम्य दुर्लक्ष कसे झाले, असा थेट सवाल जनतेतून उपस्थित केला जात आहे. अपघातानंतर रुग्णांची अवस्था काय असते, हे रोज पाहणारा व्यक्तीच जर विद्यार्थ्यांच्या जीवाशी असा खेळ करत असेल, तर ही निष्काळजीपणा की जाणीवपूर्वक दुर्लक्ष? असा संतप्त प्रश्न पालक विचारत आहेत.
ग्रामीण भागातून येणारी चिमुकली पोरं उज्ज्वल भविष्याच्या आशेने रोज शहरात शिक्षणासाठी येतात. शेती व शेतीपूरक कामांतून आयुष्य उभं करणारी ही पिढी शिक्षणाच्या नावाखाली धोक्यात ढकलली जात आहे का? संस्थेतील कारभारामुळे विद्यार्थ्यांवर जीवघेणा धोका निर्माण झाला आहे, असा आरोप पालकांनी केला आहे.
“विद्यार्थ्यांना जीवे मारण्याचा ठेका घेतला आहे का?” असा संतापजनक सवाल सध्या गावागावात ऐकू येतोय. सुरक्षिततेचे नियम पायदळी तुडवले गेले का, आवश्यक उपाययोजना का केल्या गेल्या नाहीत, जबाबदारी कोणाची? असे अनेक प्रश्न अनुत्तरितच आहेत.
दरम्यान, पालकांमध्ये बहिष्काराची चर्चा वेग घेत असून, प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून सखोल चौकशी करावी, दोषींवर कडक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
पुढील भागात उघड होणार नेमकं काय? विद्यार्थ्यांची खरी दुरवस्था आणि पडद्यामागील वास्तव?
