विधानसभेतील अपयशामुळे शरद पवार यांच्याकडून EVM चे राजकारण
‘या’ नेत्यांचा राजीनाम्याची केली मागणी

इन पब्लिक न्यूज वृत्तसेवा : विधानसभेतील अपयशामुळे शरद पवार यांच्याकडून EVM चे राजकारण केले जात आहे, असे भाजप नेते गोपीचंद पडाळकर यांनी शरद पवारांवर थेट हल्लाबोल केला. तसेच त्यांनी शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, आणि जयंत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
पुढे बोलताना त्यांनी काही मागण्या केल्या आहेत,
1. बॅलेट पेपर मतदानाची मागणी :
मारकडवाडी गावातील सभेमध्ये बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी विरोधकांनी केली होती, यावर भाजपनेही प्रत्युत्तर देत सभा घेतली.
2. गोपीचंद पडाळकर यांचे आव्हान:
शरद पवारांनी आपल्या लेकीच्या (सुप्रिया सुळे) आणि नातवाच्या (रोहित पवार) राजीनाम्याची मागणी करावी, असे आव्हान पडाळकर यांनी दिले.
3. EVM वाद आणि टीका:
पडाळकर यांनी ईव्हीएम घोटाळ्याच्या आरोपांवरून शरद पवार आणि इतर विरोधी नेत्यांवर टीका केली. त्यांच्या मते, EVM घोटाळ्याचे कोणतेही ठोस पुरावे सादर केले गेले नाहीत.
4. जयंत पाटलांसाठी बक्षीस :
जयंत पाटील यांनी EVM घोटाळा सिद्ध केल्यास त्यांना 101 रुपयांचे बक्षीस देण्याचे पडाळकर यांनी जाहीर केले.
5. मोहिते-पाटलांवर हल्ला :
भाजप आमदार रणजीतसिंह मोहिते-पाटील यांच्यावरही पडाळकर यांनी टीका केली आणि त्यांना गद्दारीचा आरोप करत राजीनाम्याची मागणी केली. 6.EVMकॉंग्रेसच्या काळात आले : मारकडवाडी ग्रामस्थांनी इतिहास केला तुमची दाखल देशपातळीवर घेण्यात आली माजी पंतप्रधान कै. राजीव गांधी यांनी नवतंत्रन्यान भारतात आणले असून EVM कॉंग्रेसच्या काळात आली आहे ७० वर्ष शरद पवार राजकारणात आहेत त्यांनी आता शांत झोप घ्यायला हवी.लोकसभा निवडणूक मतदार यंत्रावर घेण्यात आली त्यावेळी महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रत महायुतीपेक्षा जास्त उमेदवार निवडून आले होते हे पवार विसरले असल्याचे दिसून येत आहे शरद पवार व राष्ट्रवादी कांग्रेस ही गुंडांची टोळी असल्याचा आरोप करत,आमदार सदाभाऊ खोत म्हणाले ,या टोळीला गाडण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.मारकटवाडीच्या विकासासाठी आपण निधी देण्यास तयार आहे
7.EVMवर मतदान घेण्यास नागरिकांचा प्रतिसाद :- मारकड वाडी येथील सभेस उपस्थित असलेल्या लोकांना आमदार पडळकर यांनी तुम्हाला बलेट पेपरवर मतदान हवे कि यंत्रावर तेव्हा नागरिकांनी आम्हाला यंत्रावर मतदान हवे ,असे म्हणून हात उंचावून प्रतीस्द दिला
गोपीचंद पडळकर यांचे वक्तव्य: पडाळकर यांनी शरद पवार आणि त्यांच्या गटाला समाजाला चुकीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. त्याचबरोबर त्यांनी पवार कुटुंबाच्या वर्चस्वाविरोधात आपली भूमिका स्पष्ट केली.