वाढदिवस विशेष : सांगोला तालुक्याचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांना वाढदिवसानिमित्त सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव सुरू असतानाच, एक फोटो सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहेत.
एकाच गाडीतून प्रवास करत असतानाचा हा दोघा भावांचा साधा पण अर्थपूर्ण फोटो… आणि खाली ठळक संदेश—
“सांगोला तालुक्याचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.”
हा फोटो पाहताच कार्यकर्ते, समर्थक आणि नागरिकांनी लाईक्स-शेअर्सचा पाऊस पाडला. “एकत्र प्रवास, एकत्र विश्वास”, “नेतृत्वाची पुढची पिढी”
डॉ. अनिकेत देशमुख यांचा हा फोटो तरुणाईला भावणारा ठरला.
“ फोटो साधा, पण संदेश मोठा!”
वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या शुभेच्छांच्या वर्षावात हा फोटो सध्या सुपरहिट ठरत आहे.


