विशेष प्रतिनिधी :
सांगोला शहरातील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे उपमुख्याध्यापिकेच्या नियुक्तीवरून मोठा वाद उफाळून आला आहे. शिक्षण विभागाच्या नियमांचे पालन न करता, सेवाज्येष्ठतेला डावलून ही नियुक्ती करण्यात आल्याचा गंभीर आरोप शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केला आहे. या प्रकरणात शाळेचे सचिव व अध्यक्ष यांनी अधिकारांचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवत कर्मचाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
शिक्षण विभागाने आदेश दिल्यानंतरही उपमुख्याध्यापिका सचिव आणि अध्यक्षांच्या वरदहस्तांमुळे अद्याप त्यांनी आपला पदभार सोडला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे यामुळे ज्येष्ठ शिक्षकांच्या अधिकारावर गदा आणली जात आहे असा शिक्षकांनी आरोप केला आहे
दरम्यान, स्व.गणपतराव देशमुख यांच्या शिक्षण संस्थेत नेमकं चाललय तरी काय? चुकीच्या पद्धतीने शिक्षकांना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नाहक त्रास देणे, आर्थिक, मानसिक, शारीरिक नुकसान करणे असा धंदा या सचिवांनी लावला आहे का ? स्वतःच्या स्वार्थासाठी आयुष्यभर लुबाडण्याचे काम केलेल्या या सचिवांना अजून किती लोकांच्या संसार उध्वस्त करायचे आहेत असा सवाल करण्यात आला आहे? शिक्षणाच्या न्याय मंदिरात मात्र अशा प्रकारे घोटाळा करण्यात स्वर्गीय आबासाहेबांच्या नावाचा गैरवापर करून स्वतःच्या तुंबड्या भरून अध्यक्षांना चुकीची माहिती देत अध्यक्षांचीच फसवणूक करत या सचिवांनी मात्र शिक्षकांचे आयुष्य बरबाद करण्यासाठी कोणाला सोडले नाही, असा आरोप जेष्ठ शिक्षकांनी त्यांच्यावर केला आहे?
अरेsss कुठे नेऊन ठेवलीय स्व. आबासाहेबांच्या विचारांची शाळा?नेमकं चाललय तरी काय?अध्यक्ष सचिवांचा वरहस्त उपमुख्याध्यापीकेची नियमबाह्य नियुक्ती; शिक्षणअधिकाऱ्याच्या आदेशाचे पायमल्ली…
सूत्रांच्या माहितीनुसार, आवश्यक जाहिरात, सेवाज्येष्ठता यादीचा विचार आणि शिक्षण विभागाची लेखी मंजुरी न घेता नियुक्ती करण्यात आली. संबंधित नियुक्तीपत्रावर शिक्षण विभागाची अधिकृत मुद्रा अथवा मंजुरीचा उल्लेख नसल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे “नियम कुणासाठी आणि सत्ताधाऱ्यांसाठी वेगळे?” असा सवाल उपस्थित होत आहे.
दरम्यान, शिक्षण विभागाने या प्रकरणात हस्तक्षेप करत ही नियुक्ती नियमबाह्य ठरवली असून, सचिन जगताप यांनी स्पष्ट आदेश दिल्याची नोंद आहे. तरीही, आदेशांची अंमलबजावणी न झाल्याने आणि संबंधित उपमुख्याध्यापिका पदावर कार्यरत असल्याने “आदेश धाब्यावर बसवले जात आहेत का?” असा संतप्त प्रश्न शिक्षक विचारत आहेत. सूत्राच्या माहितीनुसार, व्यवस्थापनाने मुख्याध्यापकांवर दबाव टाकून नियुक्ती अमलात आणल्याचा आरोपही पुढे येत आहे.
या वादाला आणखी धार स्नेहसंमेलनाच्या पार्श्वभूमीवर मिळाली आहे. स्नेहसंमेलनात संबंधित उपमुख्याध्यापिकेच्या सक्रिय सहभागानंतर नियुक्तीचा मुद्दा अधिकच ऐरणीवर आला. सेवाज्येष्ठ शिक्षकांच्या अधिकारांवर गदा येत असल्याची भावना तीव्र झाली असून, प्रशासकीय कामकाजावरही याचा विपरीत परिणाम होत असल्याचे सांगण्यात येते.
शिक्षक संघटनांनी आरोप केला आहे की, स्व. गणपतराव देशमुख यांच्या शिक्षण संस्थेच्या परंपरेला तडा देत काही पदाधिकाऱ्यांकडून स्वार्थासाठी नियम पायदळी तुडवले जात आहेत. “स्व. आबासाहेबांच्या नावाचा गैरवापर करून अध्यक्षांना चुकीची माहिती देत स्वतःची तुंबडी भरण्याचा प्रकार सुरू आहे का?” असा रोखठोक सवालही उपस्थित केला जात आहे.
या प्रकरणामुळे शाळेत अस्वस्थतेचे वातावरण आहे. वर्षानुवर्षे प्रामाणिक सेवा देणाऱ्या सेवाज्येष्ठ शिक्षकांवर अन्याय होत असल्याची भावना बळावत असून, पालकांमध्येही नाराजी आहे. शिक्षण विभागाने तातडीने हस्तक्षेप करून नियमांनुसार उपमुख्याध्यापकाची नियुक्ती करावी आणि नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी शिक्षक व पालकांकडून होत आहे.
