रोहित हेगडे : ज्या शिक्षणसंस्थेची ओळख आदर्श, शिस्त आणि संस्कारांसाठी होती, त्याच संस्थेत आज भ्रष्टाचार, बोगस भरती आणि कोट्यवधींच्या लुटीचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. स्व. गणपतराव देशमुख यांच्या नावाने सुरू असलेल्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज आणि महाविद्यालयावर आता थेट एसआयटीची करडी नजर पडली आहे. शिक्षण मंदिर की लुटीचा अड्डा? असा थेट सवाल जनतेतून उपस्थित होत आहे.
सचिवांचा ‘स्वार्थाचा अजेंडा’? संस्थेची वाट लावण्यात जन्म गेला ?
सूत्रांच्या माहितीनुसार, संस्थेच्या सचिवाने स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी नियम, कायदे, नीतीमूल्ये सगळेच धाब्यावर बसवले. खोट्या नोंदी, बनावट कागदपत्रे, नियमबाह्य मान्यता—सगळा खेळ उघडकीस येत असून सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. “पैसा किती कमवणार? आणि शेवटी नेणार कुठे?” असा थेट सवाल नागरिक करत आहेत.
तसेच, आबासाहेबांच्या विचारावर या संस्थेत सध्या काहीच घडत नसून सचिव स्वतःच्या स्वार्थापोटी या संस्थेला धुळीस मिळवण्याचे घाणेरडे काम या शिक्षण मंदिरात करत आहे सचिवाने आजतागायत खोट्या बोगस स्वतःच्या स्वार्थासाठी तुमच्या भरून घेण्यासाठी अमाप लुटण्याचे प्रकार केले असून उघडकीस देखील आले आहेत या सचिवाला स्वतःच्या स्वार्था पेक्षा दुसरे काहीच मोठे वाटत नाही अरे पैसा कमवणार तरी किती तुम्हाला भस्म्या झालाय का हा पैसा ठेवणार तरी कुठे असा सवाल जनतेने केला आहे.
७ बोगस शिक्षक, कोट्यवधींचा घोटाळा!
या संस्थेत तब्बल सात बोगस शिक्षकांची भरती झाल्याचा आरोप आहे. मान्यता नसताना वेतन उचलणे, शासनाची फसवणूक करणे आणि संस्थेच्या तिजोरीवर डल्ला—या सगळ्यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. शिक्षणाच्या नावाखाली उघड लूट सुरू होती का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
एसआयटीकडे १६ मुद्द्यांचा स्फोटक पुरावा
तक्रारकर्त्यांनी एसआयटीकडे शैक्षणिक वर्षनिहाय तारखा, वेतन, मान्यता, प्रस्ताव, पेन्शन योजना यांचा सविस्तर लेखाजोगा सादर केला आहे. एकूण १६ गंभीर मुद्द्यांवर चौकशी सुरू असून, प्राथमिक तपासातच अनेक धक्कादायक बाबी पुढे येत असल्याचे संकेत आहेत.
जुने रेकॉर्ड, बनावट प्रस्ताव आणि पेन्शनचा खेळ
धक्कादायक बाब म्हणजे १५–२० वर्षांपासून कामच न करणाऱ्या शिक्षकांचे प्रस्ताव दाखल करून मान्यता मिळवण्यात आल्याचा आरोप आहे. काहींना जुन्या पेन्शन योजनेत नियमबाह्य पद्धतीने बसवले, तर खरे रेकॉर्ड दडपण्यासाठी संगनमत केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांची भूमिका देखील संशयाच्या भोवऱ्यात आहे.
नोकऱ्या जाणार? कायमची बडतर्फी अटळ?
एसआयटी चौकशी वेग घेत असून, गैरप्रकार सिद्ध झाल्यास संबंधित शिक्षकांची कायमस्वरूपी बडतर्फी होण्याची दाट शक्यता आहे. शिक्षण खात्यात मोठी खळबळ उडाली असून, दोषींवर कठोर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
आंदोलनाचा इशारा: ‘न्याय नाही तर रस्त्यावर!’
प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला तर उपोषण, तीव्र आंदोलन, अगदी आत्मदहनापर्यंत जाण्याचा इशारा तक्रारकर्त्यांनी दिला आहे. “सर्व पुरावे आमच्याकडे आहेत,” असा थेट दावा करत त्यांनी प्रशासनाला आव्हान दिले आहे.
सवाल जनतेचा :
शिक्षणाच्या पवित्र नावाखाली चाललेली ही लूट थांबणार का?दोषी वाचणार की कारवाई होणार?उत्तर एसआयटीच्या अहवालातूनच समोर येणार आहे!
