सोलापूर : आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सोलापूरात भाजपला प्रचंड प्रतिसाद मिळत असून तब्बल ७५० पेक्षा जास्त इच्छुक उमेदवारांनी भाजप शहर कार्यालयात अर्ज दाखल केले आहेत.
पक्षाच्या उमेदवारीसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्ज येणे ही सोलापुरातील राजकीय तापमान चांगलेच चढल्याची चिन्हे मानली जात आहेत. पुढील काही दिवसांत अर्जांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
भाजप शहर कार्यालयात उमेदवारांची झालेली ही मोठी गर्दी चर्चेचा विषय ठरत आहे.
भाजप शहर कार्यालयात तब्बल 750 पेक्षा जास्त उमेदवारांनी निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याबाबत अर्ज भरले.
