विशेष प्रतिनिधी : सांगोला :
सांगोला शहरातील डॉ. धनंजय गावडे यांच्या सद्गुरु हॉस्पिटलवर गेल्या काही महिन्यांपासून गंभीर आरोपांची मालिका समोर येत असून, या प्रकरणाची झाडाझडती सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रुग्णांकडून झालेल्या तक्रारी, कथित अनियमितता, आवाजवी बिलिंग, गैरवर्तन आणि शासकीय नियमांचे उल्लंघन याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांकडून प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली आहे. या चौकशीदरम्यान समोर आलेल्या माहितीमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वतःच्या चुका झाकण्यासाठी आणि खोटी प्रसिद्धी मिळवण्यासाठी डॉ. गावडे यांनी काही माध्यमांना पैसे देण्याचा प्रकार उघड झाले आहेत. इतकेच नव्हे तर, स्वतःच्या नावापुढे विविध पहुद्दे लावणाऱ्या लोकांचा वापर करून स्वतःची प्रतिमा उजळवण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार गेल्या काही दिवसात समोर आला आहे. या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्राला लज्जास्पद ठरेल अशी प्रसिद्धी केल्याचा करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
या प्रकरणामुळे सांगोला शहरासह तालुक्यातील वैद्यकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया :
वैद्यकीय क्षेत्रातील काही ज्येष्ठांनी इन पब्लिक न्यूजशी बोलताना स्पष्ट शब्दांत सांगितले की, “खोटी प्रसिद्धी, बनावट बातम्या आणि स्वार्थासाठी चालवले जाणारे असे प्रकार आम्ही कदापि खपवून घेणार नाही. वैद्यकीय व्यवसाय हा समाजसेवेचा मानाचा पेशा असून, त्याला गालबोट लागेल असे कोणतेही कृत्य आम्ही पाठीशी घालणार नाही.” त्यांनी अशा प्रवृत्तींचा जाहीर निषेध करत संबंधितांनी तात्काळ हे प्रकार थांबवावेत, अन्यथा कडक भूमिका घेतली जाईल, असा इशाराही दिला.
दरम्यान, सद्गुरु हॉस्पिटलविरोधातील तक्रारींची संख्या वाढत असल्याचेही सांगण्यात येत आहे. काही रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी उपचारांबाबत पुरेशी माहिती न देणे, खर्चाबाबत पारदर्शकता नसणे आणि दबावाखाली निर्णय घ्यायला लावल्याचे आरोप केले आहेत. या
वैद्यकीय क्षेत्रात अशा प्रकारच्या गैरप्रकारांना थारा देता येणार नाही. रुग्णांच्या विश्वासाशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे,” अशी भूमिका सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्याचे समजते.
सामाजिक पातळीवरही या घटनेचे पडसाद उमटत आहेत. नागरिकांमध्ये संतापाची भावना असून, पारदर्शक चौकशी आणि सत्य समोर येण्याची मागणी होत आहे. अनेकांनी प्रशासनाकडे तक्रारींच्या अनुषंगाने स्वतंत्र समिती नेमण्याचीही मागणी केली आहे, जेणेकरून वैद्यकीय सेवा देणाऱ्या संस्थांमध्ये विश्वास टिकून राहील.
दरम्यान, डॉ. धनंजय गावडे यांच्याकडून या आरोपांबाबत अद्याप अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.
एकंदरीत, सांगोला शहरातील या प्रकरणामुळे वैद्यकीय क्षेत्रातील जबाबदारी, नैतिकता आणि पारदर्शकतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रशासन, वैद्यकीय संघटना आणि समाज यांची एकत्रित भूमिका या प्रकरणात निर्णायक ठरणार असून, दोषींवर कठोर कारवाई झाली तरच अशा प्रकारांना आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
