रोहित हेगडे : सांगोला नगरपालिका निवडणुकी अत्यंत चुरशीची आणि रंगतदार पाहायला मिळाले २ डिसेंबरला मतदान झाले आणि 21 डिसेंबरला निकाल लागणार आहे परंतु प्रभाग क्रमांक 1 व 11 या प्रभागात पुन्हा निवडणूक आणि निकाल पार पडणार होते दरम्यान या दोन्ही प्रभागात बिनविरोध निवडणूक झाली आणि संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली.
यावेळी बोलताना शहाजी बापू पाटील म्हणाले, निवडणूक संपले माझे सर्वांसोबत असलेले वैर संपले मी निवडणुकीत अनेकांवर टीका केली त्यांनी माझ्यावर टीका केली परंतु आमच्यात वैयक्तिक कोणतेही मतभेद आता राहिले नाहीत तसेच तो एक निवडणुकीचा भाग होता असे बोलून शहाजीबापू पाटील यांनी स्व.गणपतराव देशमुख यांच्यासोबत केलेल्या राजकारणाची आठवण पुन्हा करून दिली.
पुढे बोलताना बापू म्हणाले येणाऱ्या काळात दोन्ही उमेदवारांपैकी कोणीही निवडून आले तरी आम्ही समोरच्या विकासासाठी सगळे एकत्र राहू राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोल्यात काम करत राहू. मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोल्यात निवडणुकीत विरोधात असलेले शिवसेना भाजप पक्ष पुन्हा एक झाल्याने स्व.आबासाहेबांच्या शिकवणीचे पुन्हा दर्शन झाल्याचे चित्र पहायला मिळाले.
