पंढरपूर सिंहगडमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनपर व्याख्यान आजोजित
महाविद्यालयातील 500 हून अधिक विद्यार्थ्यांनी या व्याख्यानाचा लाभ घेतला.

पंढरपूर/ प्रतिनिधी : पंढरपूर सिंहगडमध्ये दिनांक 21 फेब्रुवारी 2025 रोजी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी “स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन” या विषयावर मा. मयूर राजमाने, डायरेक्टर पृथ्वी अकॅडमी यांचे व्याख्यान आयोजित केले होते. या व्याख्यानामध्ये मयूर राजमाने यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा तयारी केव्हा सुरू करावी तसेच ती कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी पुढे स्पर्धा परीक्षा अंतर्गत विविध पदासाठीच्या परीक्षा पद्धती, अभ्यासक्रम, पात्रता या सर्व विषयावर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. यामध्ये महाविद्यालयातील 500 हून अधिक विद्यार्थ्यांनी या व्याख्यानाचा लाभ घेतला.
पन्हाळा वन परिक्षेत्र कार्यालय वन विभागाच्या इमारतीत : उपवनसंरक्षक जी गुरुप्रसाद यांच्या हस्ते उदघाटन
पंढरपूर सिंहगड मध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन पर व्याख्यान संपन्न झाले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, डॉ. अतुल आराध्ये, स्पर्धा परीक्षा सेलचे समन्वयक प्रा. अभिजीत सवासे, प्रा. अजित करांडे, प्रा. सिद्धेश्वर गंगोंडा, प्रा. स्वप्नाली गोड, प्रा. जयमाला हिप्परकर सह शिक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन कु. सानिका बाबर हिने केले.