रोहित हेगडे : शहरात डॉक्टर धनंजय गावडे यांच्यावरील आरोपांची मालिका थांबतानाच दिसत नाही. आता आपत्कालीन सेवा 108 व 1033 रुग्णवाहिकांच्या चालकांवरही गंभीर आरोप समोर आले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात अथवा तातडीची मदत पाहिजे असल्यास
१०८ आणि १०३३ या सरकारी आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधला तर रुग्णांना थेट डॉक्टर गावडे यांच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात.
या आरोपांनुसार, तातडीची परिस्थिती असताना रुग्णांना जिल्हा व ग्रामीण रुग्णालयात नेण्याऐवजी पैशाच्या हव्यासापोटी थेट सद्गुरू हॉस्पिटलमध्ये पोहोचवले जाते.
एका तक्रारदारांच्या सागितले, हॉस्पिटलमधून घरी जाऊ न देण्यासाठी गावडे यांच्या टीमकडून लुटमारीची ‘प्रक्रिया’ सुरु होते. किरकोळ उपचार असतानाही आयसीयू, नको त्या चाचण्या, जादा बिलिंग यांचा भडीमार केला असा आरोप त्याने केला.
शहरात चर्चेला उधाण आले असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या प्रकरणात सर्वांची चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.
पाहा भाग 3 …
