विशेष प्रतिनिधी : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तब्बल 9 वर्षांनी होत असून सांगोल्यात पहिल्याच दिवशी राजकारणाचे तापमान वाढू लागला आहे. वैयक्तिक हेवेदावे, पक्षातील नाराजी आणि जबाबदाऱ्या न मिळाल्याने नाराजी निर्माण झाली आहे. यामुळे आता तणावाचे रूप आता थेट आंदोलनात परिवर्तित होणार असल्याची चर्चा सुरू आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयातील विद्यमान अध्यक्ष, प्राचार्य आणि सचिव यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. संस्थेतील काही कर्मचाऱ्यांनी सांगितले की, “पक्षातील काही प्राध्यापकांनी पक्षाला पाठिंबा दिला म्हणून त्यांच्यावर दमदाटी, शिवीगाळ, धमक्या आणि आर्थिक मानसिक त्रास दिला जात आहे, अशी माहिती देण्यात आली.
कर्मचाऱ्यांनी याबाबत माहिती देताना सांगिलते की, विद्यमान अध्यक्ष, प्राचार्य आणि सचिव यांनी लोकशाहीवर आघात केला आहे. “स्वर्गीय आबांच्या विचारांवर चालणाऱ्या पक्षाशी निष्ठा ठेवणे हा प्रत्येकाचा घटनात्मक अधिकार आहे. मात्र अध्यक्षांनी स्वतःच्या स्वार्थासाठी त्या अधिकारावरच गदा आणली आहे.
या सर्व घडामोडींमुळे संस्थेमध्ये आणि तालुक्यात मोठी खळबळ माजली असून, “पक्षाची परंपरा आणि आबासाहेबांचा विचार बाजूला ठेवून हे कोठे पाऊल टाकले जात आहे?” असा सवाल पक्षातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.
“पक्ष म्हणजे स्वार्थ नव्हे, समाजहितासाठी असलेली चळवळ आहे,” असे मत व्यक्त करत ज्येष्ठांनी अध्यक्षांना आवाहन केले की, त्यांनी वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवावेत असे मत त्यांनी मांडले.
🛑 निवडणूक रणधुमाळीचा विस्फोटक प्रारंभ! सांगोल्यात शिक्षकांवर दबाव, शिवीगाळ आणि धमक्या? शेकापमध्ये अंतर्गत गटबाजीचा उद्रेक!
