सांगोला : सांगोला महाविद्यालयामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व भारताच्या माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी व राष्ट्रीय एकता दिवस साजरे करण्यात आले. यावेळी सरदार वल्लभभाई पटेल व भारताच्या माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, डॉ. सुरेश भोसले यांचेहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच यावेळी राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेण्यात आली.
यावेळी सरदार वल्लभभाई पटेल यांचे भारताच्या स्वातंत्र्य लढयातील महत्वाचे योगदान आहे. त्यांना भारताचे ‘पोलादी पुरूष’ म्हणून ओळखले जाते. सरदार पटेल यांनी भारतीय स्वातंत्र्य लढयात आणि एकत्रीकरणात महत्वपूर्ण भूमिका निभावली. तसेच स्व. इंदिरा गांधी यांना ‘आयर्न लेडी’ म्हणून ओळखले जाते. असे मत प्रभारी प्राचार्य, डॉ.सुरेश भोसले यांनी व्यक्त केले. भारताचे अखंडत्व व ऐक्य व लोकशाही जतन करण्यासाठी त्यांनी अनेक संकटांना तोंड दिले असे विचार यांनी मांडले.
या कार्यक्रमासाठी प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे नियोजन डॉ. सदाशिव देवकर व श्री. प्रदिप आसबे यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील आय.क्यु.ए.सी. समन्वयक डॉ. रामचंद्र पवार, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी, विदयार्थी उपस्थित होते.
