सांगोला : शिक्षण अन् नोकरी आणि करिअर या गोष्टी खुप महत्वपूर्ण आहेत. नोकरी, करिअर हे वैयक्तिक कौशल्य, गुणवत्ता तसेच व्यक्तिमत्व यावर अवलंबून असते. शिक्षण हे ज्ञान, स्वतःचे व समाजाच्या हिताचे असणे आज काळाची गरज आहे. तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे. त्यानुसार त्याच वेगाने अभ्यासक्रम बदल आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी सतर्क राहू अभ्यास करणे गरजेचे आहे. आयुष्यातील एका यशाच्या टप्यात आपण आला आहेत ते म्हणजे इंजिनिअरिंग शिक्षण आहे. हे शिक्षण म्हणजे तुमच्या करिअरची स्वप्नपूर्ती असणार असल्याचे मत फॅबटेक इंजिनिअरिंग कॉलेजच्या उपप्राचार्या डाॅ. विद्यारणी क्षीरसागर यांनी व्यक्त केले.
फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सांगोला महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात द्वितीय वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन उपप्राचार्या डाॅ. विद्याराणी क्षीरसागर, मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा. राहुल औताडे, स्टुडंट डिन डाॅ. संजय पवार, प्रा. शशिकांत माने, प्रा. प्रियंका पावसकर आदींच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा. राहुल औताडे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पुनम जाधव यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. प्रियंका पावसकर यांनी मानले.
