सांगोला : सांगोला तालुक्याच्या इतिहासात दिनांक 10 ऑक्टोबर रोजी अत्यंत दुर्दैवी विदारक तालुक्यातील प्रत्येकाच्या मनाला वेदना देणारी घटना घडली स्वर्गवासी डॉक्टर गणपतराव देशमुख यांच्या घरावर अज्ञाताने दारूची बाटली फेकून भ्याड हल्ला केला. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. घरावर घराच्या बाहेर दारूच्या बाटल्या फेकत असताना जर त्या परिसरात कोणी असते आणि त्यांनाही काचेची बाटली लागली असती तर सांगोल्यातच नाही तर आपल्या देशात एक दुर्दैवी घटना घडल्याचं चित्र पाहायला मिळालं असतं.
या हल्ल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कार्यकर्त्यांनी थेट सवाल करत विचारले आज आमच्या सांगोला तालुक्याचे आमदार त्यांचे कुटुंब सुरक्षित नाही तर सामान्य जनतेची काय याचे उत्तर तुम्हाला द्यावे लागेल राजकारणाचे भीष्म पितामह ज्यांचं
गिनीज बुक मध्ये नाव आहे असे स्वर्गीय डॉक्टर गणपतराव देशमुख यांच्या अर्धांगिनी बाईसाहेब देशमुख आणि काम करणाऱ्या ताई व इतर ऑफिस मध्ये तीन ते चार जण घरी असताना समाजकंटकांनी दारू पिऊन दारूचा बाटल्या घरावर फेकून भ्याड हल्ला केला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. हल्ला करणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा गृहमंत्री म्हणून तुम्ही लवकरात लवकर करावी असे कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली.
हा भ्याड हल्ला शेकापचे नेते स्वर्गवासी डॉक्टर गणपतराव देशमुख म्हणजेच तालुक्यातील सर्वांच्या हक्काचे असलेले घर यावर केला नसून लोकांच्या मनावर केला आहे असे शेकापच्या ज्येष्ठ नेत्यांनी माहिती दिली या भ्याड हल्ल्याला चूक प्रतिउत्तर देऊ असेही ते म्हणाले
दरम्यान सांगोला तालुक्याचे विद्यमान आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख इन पब्लिक न्यूज बोलताना म्हणाले या भ्याड हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो दिनांक 11 ऑक्टोंबर रोजी सकाळी दहा वाजता घरासमोर सर्व शेकापच्या कार्यकर्त्यांनी येऊन याचा निषेध करत असताना शांतता संयम आणि कायद्याचे पालन करून करावा असे आव्हान त्यांनी सर्वांना केले
इन पब्लिक न्यूज शी पुढे बोलताना ते म्हणाले ज्या कोणी अज्ञात आणि हा भ्याड हल्ला केला त्याला समज देऊन सोडून द्यावे तसेच त्याचे नाव प्रशासनाने उघड करू नये आज आबासाहेबांच्या विचार आचार याला धक्का लागला असे ते म्हणाले
शेकापच्या नेत्यांनी कडक शब्दात म्हणाले…
आमच्या घरावर दारूच्या बाटल्या टाकून हल्ला केला तुमची तीच लायकी शेकापच्या ज्येष्ठ नेत्यांनी हा भ्याड हल्ला करणाऱ्याला कडक शब्दात ठणकावले या कृत्याला आम्ही लवकरच चोख प्रतिउत्तर देऊ असे त्यांनी इन पब्लिकनशी बोलताना सांगितले

