सांगोला : सांगोला तालुक्यातील राजकारणात मोठे उलथापालथीचे संकेत! शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) नेते डॉ. अनिकेत देशमुख हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे. स्थानिक राजकीय वर्तुळात या चर्चेला अधिक जोर मिळत असून, अनेक नेते व कार्यकर्त्यांमध्ये याबाबत कुजबूज सुरू आहे.
एका कार्यक्रमादरम्यान माध्यमांशी बोलताना डॉ. देशमुख यांच्या विधानामुळे या चर्चेला आणखी उधाण आल्याचे म्हटले जात आहे.
आम्ही निश्चितपणे जी जबाबदारी असेल ती पार पाडू. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये मी प्रत्येक मैदानावर लोकांसाठी उभा आहे येणार आहे. मी लोकांना जी भूमिका आवडेल त्या भूमिकेत लोकांसमोर असेल असे ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले जे लोक काम करणार आहेत त्या लोकांसोबत आम्ही आहोत आत्तापर्यंत आम्ही आमच्यासाठी काम केलं इथून पुढे आम्ही त्यांच्यासाठी काम करू स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुकीमध्ये ज्यांची जितकी ताकत असेल त्यांच्यासोबत निश्चितपणे अनिकेत देशमुख असेल तसेच येणाऱ्या निवडणुकीत शेकापकडून माझ्यावर काय भूमिका देणार की नाही हे पक्षाला माहिती असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
दरम्यान सांगोला तालुक्यात होणाऱ्या श्रेय वादावर बोलताना ते म्हणाले, प्रत्येकाचं काम बोलत लोकांना काम दिसतं जो काम करतो त्याच्या पाठीमागे निश्चितपणे जनता राहत असते जनता बघत असते की कोण 1काम करता न करता त्यामुळे आपण आपल्या तकदीने काम करावं असं श्रेय वादावर बोलताना ते म्हणाले.
राजकीय तज्ञाच्या मते, डॉ. अनिकेत देशमुख यांच्या भूमिकेमुळे सांगोला तालुक्यातील शेकाप आणि भाजपचे समीकरण नव्याने आकार घेण्याची शक्यता आहे.
