सांगोला/प्रतिनिधी : सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांचे खुप मोठे नुकसान झाले. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सामाजिक बाधिलकी म्हणून सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर-१०, दक्षिण सोलापूर-१७, माढा-२१ आणि करमाळा-७ तालुक्यातील एकुण ५५ गावात नुकसानग्रस्त कुटुंबाना सांगोला फॅबटेक फाउंडेशन, फॅबटेक इंजिनिअरिंग कॉलेज, स्पार्काॅन टेक्स्टाईल, फॅबटेक उद्योग समुह आणि फॅबटेक मल्टिस्टेट बॅक यांच्या संयुक्त विद्यमानाने जीवनावश्यक वस्तूचे कीट वाटप करण्यात आले असल्याची माहिती फॅबटेक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब रूपनर यांनी दिली.
फॅबटेक फाउंडेशन मोठ्या प्रमाणात सामाजिक उपक्रम राबवत आहे. पावसामुळे संकटात असलेल्या कुटुंबास गहू, तांदूळ, तुरदाळ, साखर, चहापत्ती, गोडेतेल, गुडनाईड, सतरंज्या, ब्लँकेट्स कपडे आदींसह अशा एकुण २० वस्तूचा समावेश असणारे दहा हजार किट तयार करून पूरग्रस्त भागातील कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूचा मदतीचा हात दिला आहे.
फॅबटेक फाउंडेशन सह फॅबटेक परीवार मधील कर्मचाऱ्यांचा एकदिवसीय पगार असा एकुण २५ लाखांच्या वस्तूचे जीवनावश्यक कीट वाटप करण्यात आले आहे.
सामाजिक भान डोळ्यासमोर ठेवून फाउंडेशन फाउंडेशन सामाजिक उपक्रम राबवत असुन यापुर्वी वृद्धाश्रमात अन्नदान, वारकऱ्यांना रेनकोट वाटप, फराळ आदींसह अनेक उपक्रम फॅबटेक फाउंडेशनच्या माध्यमातून होत आहेत. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी फॅबटेक एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ.अमित रूपनर, फॅबटेक फाउंडेशनचे उपाध्यक्ष डॉ. सुरज रूपनर, फॅबटेक मल्टिस्टेट बॅकेचे संचालक डॉ.संजय आदाटे, सीईओ बाबासाहेब भोसले, कर्ज विभागप्रमुख दिपक नागणे, मुख्य वित्त अधिकारी विजय तंडे आदींसह फॅबटेक फाउंडेशन सह फॅबटेक परिवारातील सदस्यांनी परीश्रम घेतले.
