पंढरपूर सिंहगड कॉलेज महाविद्यालयाचे डोळे तपासणी शिबीर व दंतचिकित्सा शिबाराचे आयोजन
शिबीरामध्ये रोटरी क्लब पंढरपूर यांच्याकडून सर्व रुग्णांना टूथब्रश व टूथपेस्टचे वाटप करण्यात आले

पंढरपूर/प्रतिनिधी : एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कोर्टी, पंढरपूर व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत मोफत दंत चिकित्सा व डोळ्यांची चिकित्सा याबाबतचे शिबिर खेड भाळवणी तालुका पंढरपूर येथे आयोजित केले होते. या शिबिरात जिल्हा परिषद शाळेतील १५० विद्यार्थी व ग्रामस्थ मिळून २०० रुग्णांची दंतचिकित्सा तपासणी करण्यात आली आणि डोळ्यांच्या चिकित्सेसाठी ७० हून अधिक ग्रामस्थांनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमासाठी पंढरपूरचे इंडियन डेंटल असोसिएशनचे दंतचिकित्सक म्हणून डॉ. जमदाडे, डॉ. योगेश दोशी, डॉ. भातलवंडे, डॉ. खूपसिंगेकर, डॉ. जरे मॅडम यांनी रुग्णांची तपासणी केली व डोळ्यांचे डॉ. बहिरवाडे यांनी रुग्णांची तपासणी केली.
सिंहगड पंढरपूर महाविद्यालयाकडून श्रमसंस्कार शिबीरामध्ये महिला आरोग्य तपासणी
सदरील शिबीरास खेडभाळवणी गावक-यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. या शिबीरामध्ये रोटरी क्लब पंढरपूर यांच्याकडून सर्व रुग्णांना टूथब्रश व टूथपेस्टचे वाटप करण्यात आले.
रोटरी क्लब पंढरपूर आणि राष्ट्रीय सेवा योजना सिंहगड कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिंहगड कॉलेजचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य. डॉ. एस. जी. कुलकर्णी व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमअधिकारी प्रा. चंद्रकांत देशमुख, प्रा.सिद्धेश्वर गंगोंडा, प्रा.सुमित इंगोले, प्रा.मासाळ, प्रा.अजित करांडे , प्रा.गुरुराज इनामदार व एन एस एस चे प्रेसिडेंट अथर्व कुराडे, सेक्रेटरी किशोर नरळे, नाना वाघमारे, सत्यम कापले, प्राप्ती रुपनर,तेजस्वी खांडेकर, अनुप नायकल, चेतन मासाळ, वैष्णवी पडगळ, आकांशा कवडे, सुमित अवताडे, आकाश चौगुले, प्राजक्ता डोंगरे, रशीद पठाण, हर्षद शिंदे यांनी परिश्रम घेतले.