हॅटसन प्रा. लि. शिरशीवर शेतकरी व कामगारांची गंभीर आरोपांची सरबत्ती!
शिरशी/प्रतिनिधी : हॅटसन प्रा. लि. शिरशी या दूध कंपनीविरोधात शेतकरी, गावकरी व कामगारांनी गंभीर आरोपांचा पाढा वाचला आहे. कंपनीकडून शेतकऱ्यांना कमी पैसे देऊन त्यांच्या कडून पाणी घेतले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. स्थानिक तरुणांना नोकरी न देता बाहेरील अधिकाऱ्यांकडून मनमानी कारभार केला जात असल्याचा आरोपही उघड झाला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीत कार्यरत असलेल्या कामगारांना त्रास दिला जातो, तर गावकऱ्यांना आंदोलन केले तरीही पोलिस-प्रशासन कोणतीही कारवाई करत नाही. उलट ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील यांना कंपनीकडून “चिरीमिरी” मिळते, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.

स्थानिक तरुणांना रोजगार नाकारला, बाहेरून आलेल्या अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार? कंपनीकडून लाखो लिटर पाणी उत्पादनासाठी वापरले जाते. हे पाहणीसाठी गेलेल्या ग्रामस्थांना कंपनीने आत प्रवेश न देता बाउन्सर मार्फत अडवले जाते, अशी तक्रार समोर आली आहे.
ओव्हरलोड गाड्यांची वाहतूक, अपघाताची शक्यता वाढली तरी पोलीस शांत!
येथील नागरिकांनी आरोप आहे की हॅटसन कंपनीने या दोन तालुक्यांतील शेतकरी व नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली आहे. बिले काढताना टक्केवारी द्यावी लागते, ओव्हरलोड गाड्या भरल्या जातात, तसेच बाहेरील राज्यातील मालवाहतूक गाड्यांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.
प्रशासन आळीमिळी गुपचिळीची भूमिकेत का?
या कंपनीविरोधात अनेक तक्रारी दाखल झाल्या असल्या तरी प्रशासन आळीमिळी गुपचिळीची भूमिका घेत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. ओव्हरलोड मालवाहतूक थांबवली जात नाही, कंपनीवर कोणतीही कारवाई होत नाही. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का?” असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
स्थानिकांचा इशारा :
जर तात्काळ कारवाई झाली नाही तर मोठ्या आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
