सांगोला/प्रतिनिधी : फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सांगोला महाविद्यालय आणि पुणे येथील साॅफ्टटेक सोल्युशन अँड ट्रेनिंग प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार झाला असल्याची माहिती संस्थेचे सचिव डॉ. अमित रूपनर यांनी दिली.
फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सांगोला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसना इंडस्ट्रियल व्हिजिट, वर्कशॉप, गेस्ट लेक्चर्स, इन प्लांन्ट ट्रेनिंग, स्पाॅन्सर्ड प्रोजेक्ट आदीसह महाविद्यालयातील अनेक गोष्टीसाठी साॅफ्टटेक सोल्युशन अँड ट्रेनिंग प्रा. लि. कंपनीचा फायदा होणार आहे.
हा करार होणेसाठी प्रा. गणेश मिसाळ यांनी समन्वयक घडवून आणाला. करार दरम्यान आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. सोमनाथ ठिगळे, डॉ.सहदेव शिंदे, प्रा. गणेश हुंडेकरी आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.
हा करार झाल्यानंतर फॅबटेक टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा नीलवर्णा बिरासाहेब रूपनर, उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, सचिव डॉ.अमित रूपनर, कार्यकारी संचालक दिनेश रूपनर, इस्टेट डायरेक्टर डॉ. संजय आदाटे, व्यवस्थापक प्रतिनिधी प्रा.प्राजक्ता रूपनर, प्राचार्य डॉ. रविंद्र शेडंगे, उपप्राचार्या डॉ. विद्याराणी क्षीरसागर आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या असुन हा करार सात वर्षेसाठी असणार आहे.
