लाखोंचा खर्च करून महिलांसाठी भरवला कार्यक्रम; पण पूरग्रस्त नागरिकांना मदत नाही ?
विशेष प्रतिनिधी : सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे सर्वत्र नद्यांना पूर आला आहे. अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. अनेकांचे संसार उघड्यावर आल्याचे चित्र आहे.
सोलापूर जिल्ह्यातील पूरस्थिती पाहण्यासाठी मंत्री, नेते,लोकप्रतिनिधी यांचे पाहणी दौरे सुरू आहेत. परंतु लोकांना भरीव मदत अध्याप करण्यात आलेली नाही.“आश्वासनांची मालिका सुरू आहे, परंतु मदतीचा ठोस निर्णय होत नाही,” असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
लाखोंचा खर्च करून महिसालांठी कार्यक्रम! नागरिकांना कोणतीही मदत नाही?
दरम्यान लाखोंचा खर्च करून महिसालांठी ३ दिवसासाठी कार्यक्रम कार्यक्रम होतोय. परंतु नागरिकांना कोणत्याही प्रकारे मदत केली नाही असा आरोप पूरग्रस्त नागरिकांनी केला आहे. नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. “आमचे संसार उघड्यावर आले, मुलांना अन्न नाही, घरात पाणी आहे. आम्हाला आश्वासने नकोत, तात्काळ मदत हवी,” असा टाहो पूरग्रस्तांनी फोडला आहे.
पूरपरिस्थितीचा त्वरित सामना करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने प्रयत्न सुरू केले असले तरी मदतीचा वेग अपुरा असल्याची सर्वत्र चर्चा आहे. पूरग्रस्तांना अन्न, पाणी, निवारा आणि आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी शासन व लोकप्रतिनिधींनी तातडीने पुढाकार घ्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
