सांगोला : सांगोला येथील फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च या अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापिका म्हणून कार्यरत असलेल्या प्रा. स्वाती सतीश माने यांना रसायनशास्त्र या विषयात पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे.
प्रा. माने यांनी जगदीश प्रसाद झांबरमल टीबरेवाला युनिव्हर्सिटी, झुंझुनू (राजस्थान) येथून रसायनशास्त्र विभागातून भारतामध्ये सामान्यपणे वापरण्यात येणाऱ्या चहा यांच्या अर्कांचे साधनात्मक विश्लेषण आणि अनुप्रयोग या विषयावर प्रबंध सादर केला होता.
या प्रबंधासाठी सांगोला महाविद्यालयातील रसायनशास्त्र रसायनशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. प्रकाश बनसोडे यांचे मार्गदर्शन लाभले.
डॉ. स्वाती सतीश माने यांनी पीएच. डी. प्राप्त केल्याबद्दल फॅबटेक टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती नीलवर्णा बिरासाहेब रूपनर, उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, सचिव डॉ. अमित रूपनर, कार्यकारी संचालक दिनेश रूपनर, इस्टेट डायरेक्टर डॉ. संजय आदाटे, व्यवस्थापक प्रतिनिधी प्रा. प्राजक्ता रूपनर, प्राचार्य डॉ. रविंद्र शेंडगे, उप-प्राचार्या डॉ. विद्यारणी क्षीरसागर, प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. ज्योती शिंदे, डॉ. विभुते, डॉ. संजय पवार,प्रा. अनघा येलपले, प्रा. राजकुमार गावडे, प्रा. शरद आदलिंगे, प्रशांत गोडसे आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
