प्रतिनिधी : एका थरकाप उडवणाऱ्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा लोखंडी गजाने वार करून खून केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्या डोक्यात लोखंडी गजाने वार करून हत्या केली. पत्नीचा खून केल्यानंतर आरोपी स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झाला आणि गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, चारित्र्याच्या संशयामुळे उभी राहिलेली ही हृदयद्रावक घटना चर्चेचा विषय ठरली आहे.
