पुणे : महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असून पुढील ४८ तास राज्यासाठी धोक्याचे ठरणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसामुळे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे.
शेती आणि जनजीवनावर विस्कळीत :
पावसामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे जनावरांचा मृत्यू, शेतजमिनींचे मोठे नुकसान तर अनेकांचे संसार उघड्यावर येण्याची वेळ आली आहे.
जोरदार वाऱ्यांचा धोकाही :
हवामान विभागाने पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यावेळी प्रति तास 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे यांचे दुहेरी संकट राज्यासमोर उभे राहणार आहे.
या जिल्हाना अलर्ट :
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी. सोलापूरमध्ये आधीच झालेल्या हानीनंतर पुन्हा पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर, बीड आणि धाराशिव येथे मुसळधार पावसाचा इशारा. विदर्भातील नागपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली आणि चंद्रपूर यासह जवळपास सर्व जिल्ह्यांना हाय अलर्ट. नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावे, नदी-नाल्यांलगत जाणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
