विशेष प्रतिनिधी : विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच समाजासाठी योगदान दिलेल्या मान्यवरांचा गौरव हा सर्वांसाठी प्रेरणादायी आणि अभिमानास्पद आहे. समाजातील हिऱ्यांना शोधून काढून त्यांना सन्मानित करणाऱ्या टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनल परिवारांचे कार्य कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गर बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक डी.राम.रेड्डी म्हणाले.
टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलच्यावतीने देण्यात आलेल्या आयकॉन ऑफ महाराष्ट्र अवॉर्ड 2025 पुरस्कार वितरण सोहळा सोलापूर शहरातील हॉटेल सरोवर येथे पार पडला. त्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी विचारमंचावर प्रमुख पाहुणे म्हणून अक्कलकोट येथील वटवृक्ष स्वामी समर्थ मंडळाचे चेअरमन महेश इंगळे, सोलापूर बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता मुळे, टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनेलचे संचालक धनंजय शिंदे आदी मान्यवर उपस्थिती होते. याप्रसंगी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 27 मान्यवरांचा सन्मानचिन्ह, शाल देऊन पुरस्काराने गौरव करण्यात आला. पुरस्काराचे हे आठवे वर्ष आहे.
राम रेड्डी पुढे म्हणाले, पुरस्काराने सन्मानित झालेले विविध क्षेत्रातील आयकॉन आहेत. त्यांचे कार्य गौरवास्पद आणि प्रेरणादायी असे आहे. गेल्या आठ वर्षापासून संचालक धनंजय शिंदे हे अथक प्रयत्न करून तसेच अडचणीवर मात करत हा गौरव सोहळा आयोजित करत असतात. त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. विविध क्षेत्रातील हिऱ्यांचा गौरव हा सर्वांसाठी महत्त्वपूर्ण असा आहे असे सांगत सर्व सत्कारमूर्तींचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या.
यापूर्वी करत असलेले कार्य आता अधिक जोमाने आणि वेगळ्या पद्धतीने करावे लागणार आहे. सामाजिक बांधिलकी जोपासत यापुढेही सर्व आयकॉन कार्यरत राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन उपसंपादिका पल्लवी माने यांनी केले. विविध क्षेत्रातील मान्यवरांसह कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुरस्काराने सन्मान :
यावेळी दैनिक तरुण भारतचे मुख्य संपादक प्रशांत माने, माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे, डॉ. मनोहर इनामदार, डॉ. दीपक गायकवाड – पाटील, अमित कामतकर , प्रमोद तम्मन्नवार, कल्पेशकुमार मालू, मानसी मेहता, जितेंद्र नाईक – लाड , हरेश म्हेत्रस , शुभांगी दर्गोपाटील, सुनील दावडा, डॉ. लता पाटील, नवनाथ इंदापुरे , प्रा. डॉ. भीमाशंकर बिराजदार , प्रा. अरविंद बगले, श्रीपाद कदम, सोमेश्वर याबाजी, मंजुषा माने , ऋतुजा रत्नपारखी – पाटील, पल्लवी माने, दीपा मडकी, कविता घोडके- पाटील, हेमंत वाघमारे, उदयसिंग साळुंके , उमेश भगत आणि वसंत पोतदार आदी मान्यवरांचा या पुरस्काराने गौरव करण्यात आला.
