सांगोला/प्रतिनिधी : सांगोला तालुक्यातील सोनलवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सोनलवाडी येथील एका युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मोबाईलवर मेसेज पाठवून पीडितेला गावातील बांधाजवळ बोलावले. लग्नाचे आमिष दाखवून तसेच धमकावून त्याने तिच्यावर अत्याचार केला. याबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी (मंगळवेढा) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, सांगोला पोलिसांनी आरोपीविरुद्ध पुढील तपास सुरू आहे.
