सांगोला : अवैध कत्तलखाना प्रकरणी सांगोला पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला आहे. यामध्ये ८ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे ४.२० वाजता आठवडा बाजार परिसरात, एका पत्रा शेडवर छापा मारण्यात आला. गोवंश कत्तलीचासाठा व जिवंत वासरे पोलिसांना मिळून आली. जप्त मुद्देमाल –बोलेरो पिकअप वाहन (किंमत ५ लाख रुपये),अंदाजे १५०० किलो गोमांस (किंमत ३ लाख रुपये),तब्बल ४० लहान जर्सी वासरे (किंमत ८० हजार रुपये),कत्तलीसाठी वापरलेली साधने – लाकडी ओंडका, सुऱ्या, सधुर असा एकूण मुद्देमालाची किंमत – ८,८०,०००/- रुपये ताब्यात घेतले. तसेच पत्रा शेडमध्ये अंदाजे १००० -१५०० किलो गोमांस साठवलेले तसेच बांधून ठेवलेली ४० लहान वासरे आढळली. या वासरांना चारा-पाण्याची व औषधोपचाराची कोणतीही सोय केली नाही.
या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ/138 भोसले करत आहेत.
