पंढरपूर सिंहगडमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागामध्ये कार्यशाळा संपन्न्
कार्यशाळेमुळे असंख्य कंपन्यामध्ये रोजगारांची संधी उपलब्ध होईल

पंढरपूर/ प्रतिनिधी : एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभाग आणि इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनियरिंग (IETE) यांच्या संयुक्त विद्यमाने मॉडेल बेस्ड सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट युजिंग सिमिलिंक अँड स्टेट फ्लो या विषयावर कार्यशाळाचे आयोजन तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना करण्यात आले.
सांगोला आगाराला तातडीने २० नवीन बसेस उपलब्ध करून द्याव्यात : विकास पोपळे,आगार व्यवस्थापक
ही कार्यशाळा प्रा.ए.डी.हराळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. या कार्यशाळेमध्ये मॅटलॅब सॉफ्टवेअर मधून वेगवेगळे मॉडेल डिझाईन केले व त्या मॉडेलचा उपयोग ऑटोमेटिव्ह सेक्टर साठी, इंडस्ट्रियल ऑटोमेशन, टेलीकम्युनिकेशन आणि कमर्शियल उपयोगासाठी उपयुक्त ठरणार आहे. मॅथवर्क, लियर कार्पोरेशन ,मिंडाज ऑटोसॉफ्ट इंजिनियर्स प्रायव्हेट लिमिटेड, के पी आय टी टेक्नॉलॉजी, टाटा टेक्नॉलॉजी अशा असंख्य कंपन्यामध्ये रोजगारांची संधी उपलब्ध होईल अशी माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमात ५५ हून अधिक विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी विभाग प्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी यांनी समाधान व्यक्त केले आणि विद्यार्थ्यांना मिळालेले ज्ञान त्यांच्या भविष्यात उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.