विशेष वृत्त : समाजात प्रत्येक व्यवसायाचे वेगळे स्थान असते. डॉक्टर आजार बरे करतात, अभियंते डिझाइन करतात, बँकर्स पैशाचे व्यवस्थापन करतात. मात्र, या सर्वांना घडवणारे जे व्यक्तिमत्त्व असते ते म्हणजे प्रमाणिक शिक्षक. विद्यार्थी जीवनात त्यांना ज्ञान देणे, प्रेरणा निर्माण करणे आणि सर्जनशील विचारांना चालना देणे ही महत्त्वाची जबाबदारी शिक्षकच पार पाडतात.
“गुरू हा तो दीप आहे, जो अज्ञानाच्या अंधःकारात आपल्याला ज्ञानाचा प्रकाश देतो.”
“शिक्षण हा असा व्यवसाय आहे जो इतर सर्व व्यवसाय शिकवतो,” हे शिक्षकांच्या भूमिकेचे अचूक वर्णन करते. प्रत्येक यशस्वी अभियंता, डॉक्टर, अधिकारी किंवा शास्त्रज्ञाच्या मागे एखादा शिक्षक उभा असतो. भारतीय संस्कृतीत तर गुरूला देवांपेक्षा श्रेष्ठ मानले जाते. अलेक्झांडर द ग्रेट याने एकदा म्हटले होते, “मी माझ्या वडिलांचा जगण्यासाठी ऋणी आहे, पण माझ्या शिक्षकाचाही माझ्या जीवनाला अर्थ देण्यासाठी ऋणी आहे.”
समाजाच्या घडणीत शिक्षक समाजाचे आधारस्तंभ
शिक्षक हे सुदृढ व प्रगत समाजाचे आधारस्तंभ आहेत. पालकांनंतर मुलांसाठी ज्ञान आणि मूल्यांचे पहिले खरे स्रोत म्हणजे त्यांचे शिक्षक. ते मुलांना फक्त पुस्तकी ज्ञानच देत नाहीत, तर जीवनातील नैतिक मूल्ये, शिस्त आणि आत्मविश्वासही शिकवतात.
डॉक्टर रुग्णांवर उपचार करतो, अभियंता यंत्रे किंवा इमारती बांधतो; पण शिक्षक राष्ट्र घडवतो. आजचे विद्यार्थी हे उद्याचे नेते आहेत, आणि त्यांना योग्य दिशा देणारा गुरु म्हणजे शिक्षक.
प्रत्येक शिक्षक आपापल्या पद्धतीने वेगळा असतो. काही कडक शिस्त लावणारे असतात तर काही प्रेमळ मार्गदर्शन करणारे. परंतु सर्वांचा उद्देश एकच असतो – विद्यार्थ्यांना यशाच्या शिखरावर पोहोचवणे. शिक्षक हे असे मार्गदर्शक असतात जे विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेतात, त्यांना आत्मविश्वास देतात आणि स्वतःच्या अपेक्षेपलीकडे जाऊन त्यांचा विकास घडवतात.
एक चांगला शिक्षक मेणबत्तीसारखा असतो; तो इतरांसाठी मार्ग उजळवण्यासाठी स्वतःला नेहमी ज्वलंत ठेवतो. ही उक्ती शिक्षकांच्या त्यागमय भूमिकेची साक्ष देते.
शिक्षकांशिवाय समाज अपूर्णच :
आजच्या स्पर्धात्मक युगात अनेक तरुण वेगवेगळी स्वप्ने बघतात. परंतु शिक्षक बनण्याची इच्छा व्यक्त करणारे कमीच असतात. प्रत्यक्षात शिक्षकांशिवाय समाजाची कल्पनाच करता येणार नाही. पालक आपल्याला जीवनातील प्राथमिक शिक्षण देतात, पण आयुष्याचा पाया रचणारे आणि घडवणारे शिक्षकच असतात. त्यांच्यामुळेच आपण सक्षम, स्वावलंबी आणि जबाबदार नागरिक होतो.
शिक्षक हा राष्ट्राच्या यशाचे आणि आकांक्षांचे मोजमाप करणारा मापदंड आहे.
गुरु शिवाय जीवन अधुरे आहे; गुरूंनी दाखवलेला मार्गच आपल्याला यशाकडे नेतो.गुरु शिवाय जीवन अधुरे आहे; गुरूंनी दाखवलेला मार्गच आपल्याला यशाकडे नेतो.
In Public news कडून सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा! …!
शि.. शीलवान, क्ष.. क्षमाशील, क.. कर्तव्यनिष्ठ, हे गुण विद्यार्थ्यांला देऊ करणारा दुवा म्हणजे “शिक्षक”
