हतिद (ता. सांगोला) : गावातील सामाजिक बांधिलकी जपत हनुमान मंदिर परिसरात शंभुराजे प्रतिष्ठान आयोजित जय हनुमान गणेश मंडळ व समस्त ग्रामस्थ हतिद यांच्या वतीने एक भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
“रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान” या संदेशाला बळ देण्यासाठी आयोजित केलेल्या या शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या उपक्रमात तब्बल ६० जणांनी रक्तदान करून समाजासाठी एक आदर्श घालून दिला.
गणेशोत्सवासारख्या धार्मिक आणि सांस्कृतिक सणाच्या माध्यमातून सामाजिक जाणीवा रुजवण्याचा उपक्रम केल्याने वातावरणात उत्साह आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले. आयोजकांनी सांगितले की, अशा उपक्रमांमुळे ग्रामस्थांमध्ये रक्तदानाबद्दल जागरूकता वाढेल आणि गरजू रुग्णांना जीवनदान मिळण्यास मदत होईल.
