सांगोला : सांगोला शहर व तालुक्यातील २५३ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पोलीस स्टेशनकडे नोंदणी केली आहे. यावर्षी गणेशोत्सव मोठ्या आनंदात व उत्साहात संपन्न होत आहे. सांगोला शहरातील ९ गणेशउत्सव मंडळांच्या श्री गणेशाचे व ग्रामीण भागातील ५० गणेशोत्सव मंडळाच्या श्री गणेशाचे विसर्जन करण्यात येणार असल्याची माहिती सांगोला पोलीस स्टेशनकडून मिळाली आहे.
श्री गणेशाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस प्रशासनाकडून बंदोबस्त व्यवस्था करण्यात आली आहे. पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच होमगार्ड बंदोबस्ताचे काम पाहणार आहेत. गणेश विसर्जन शांततेत व आनंदात पार पडावे यासाठी पोलीस प्रशासन व गणेशोत्सव प्रयत्न करीत आहेत.
