मुंबई : मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा सरकारला थेट इशारा दिला. मराठा बांधवांना सरकारकडून अडवायचा प्रयत्न केला जात आहे. त्यांनी असे केले तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे त्यांनी कडक शब्दात सरकारला ठणकावले.
मनोज जरांगे पाटील म्हणाले… :
मुंबईत मोठ्या प्रमाणात मराठा बांधव येत आहेत. त्यांना रोखण्याचा प्रयत्न कोणी करू नये.
सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे हे आंदोलन पेटले आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेमुळे मराठा समाजाची नाराजी वाढली आहे.
आमचे आंदोलन हे समाजाच्या हक्कांसाठी आणि कल्याणासाठी आहे; त्याला कोणी थांबवू शकत नाही.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेली थेट टीका आणि मराठा बांधवांना दिलेला खुला इशारा यामुळे आगामी काही दिवसांत राजकीय वातावरण अधिकच तापणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
दरम्यान, सरकारने तातडीने तोडगा काढला नाही तर परिस्थिती आणखी चिघळण्याची भीती व्यक्त होत आहे.
