मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil Azad Maidan) यांनी मुंबईत शक्तिप्रदर्शन करत प्रवेश केला. हजारो गाड्यांच्या ताफ्यासह सकाळी मुंबई गाठताच त्यांनी आझाद मैदानात उपोषणास सुरुवात केली. या आंदोलनामुळे आझाद मैदान परिसर फुल्ल झाला असून दक्षिण मुंबईत प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. गणेशोत्सवाच्या गर्दीमुळे परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे.(Manoj Jarange Patil Azad Maidan)
मनोज जरांगे (Manoj Jarange Patil Azad Maidan) यांनी उपोषणाच्या सुरुवातीलाच भूमिका स्पष्ट करत, मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत मुंबई सोडणार नाही. गोळ्या झाडल्या तरी मागे हटणार नाही. डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय इथून उठणार नाही, असा इशारा दिला. त्यांनी सरकारला थेट चर्चेसाठी आझाद मैदानात यावे, अशी मागणी केली.(Manoj Jarange Patil Azad Maidan)
दरम्यान, राज्य शासनाने या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेतली असून संध्याकाळी सरकारचे शिष्टमंडळ आझाद मैदानात येऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन चर्चा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या शिष्टमंडळात कोण-कोण असणार, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही.(Manoj Jarange Patil Azad Maidan)
