
सांगोला : श्री गणेश उत्सव आगमन व समर्थ सदगुरू श्री गजानन महाराज यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त एक भव्य तालुकास्तरीय तबलावादन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना सांगोला शहर उपप्रमुख मा. सोमेश यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
ही स्पर्धा शुक्रवार दिनांक २९ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० वाजता, साजिरा आळा हनुमान मंदिर, महादेव गल्ली, सांगोला येथे पार पडणार आहे.
स्पर्धेचे गट आणि बक्षिसे:
१ ला गट (पाचवी ते आठवी):
प्रथम क्रमांक – ₹७,००१/-
द्वितीय क्रमांक – ₹५,००१/-
तृतीय क्रमांक – ₹३,००१/-
२ रा गट (नववी ते बारावी):
प्रथम क्रमांक – ₹७,००१/-
द्वितीय क्रमांक – ₹५,००१/-
तृतीय क्रमांक – ₹३,००१/-
३ रा गट (खुला गट):
प्रथम क्रमांक – ₹७,००१/-
द्वितीय क्रमांक – ₹५,००१/-
तृतीय क्रमांक – ₹३,००१/-
स्पर्धकांनी सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी गुरुवार दिनांक २८ ऑगस्ट २०२५ पर्यंत करणे अनिवार्य आहे. यासाठी संपर्क सूत्र
श्री. अतुल उकले – ९८८१५ १७०९३
श्री. गणेश भंडारे – ९५०३९ ०३६०१
ही स्पर्धा सांगोला तालुक्यातील कलाकारांसाठी एक सुवर्णसंधी असून, पारंपरिक वाद्यसंगीताला चालना देण्यासाठी एक प्रेरणादायी पाऊल ठरेल. नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कलाकारांचे मनोबल वाढवावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.