
सांगोला : शहरातील गणपती मंदिरा पाठीमागे असलेली पैलवान वस्ती, एखतपुर, स्पार्कोन या भागात लांडग्याने तरुण तसेच वयोवृद्ध लोकांवर जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात ८-१० लोक जखमी झाले आहेत. काहींच्या तोंडावर, पायावर तर काहींच्या पोटावर हल्ला करून जखमी केली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांकडून रुग्णांवर उपचार नाहीत ?
मिळालेल्या माहितीनुसार, हल्ला झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ रुग्णांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी काही वेळ रुग्णांवर उपचार केले नाहीत. नातेवाईकांनी त्यांना जाब विचारला असता त्यांनी उडवाउडविची उत्तरे देत आमच्याकडे लस नाही त्यांना सोलापूर येथे घेऊन जा असे सांगितले. यामुळे नातेवाईकांमध्ये संतापाची लाट उसळली. डॉक्टरांन देव म्हणले जाते परंतु ते जर उपचार करत नसतील तर नागरिकांनी जायचे कुठे असा सवाल उपस्थित होतो?
लांडग्याला शोधून कैद करण्याची मागणी
वनविभागाने तात्काळ लांडग्याला शोधून कैद करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे. तसेच गेल्या पाच ते सहा महिन्यापासून पैलवान वस्ती येथे अनेक लांडग्यांचा वावर दिसून आल्याचे परिसरातील नागरिकांनी माहिती दिली.