
सांगोला : राज्याचे ग्रामविकास मंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मंजुरी दिली असून या कामासाठी ५ कोटी ७० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
ही मागणी माजी आमदार ॲड. शहाजीबापू पाटील यांनी जानेवारी २०२४ मध्ये केली होती. त्यांनी या पुलाच्या बांधकामासाठी सतत पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
कामाचे तपशील
गार्डी ते मोरेवस्ती रस्त्यावरील साखळी पूल उभारण्यात येणार आहे.हे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत, आशियाई विकास बँकेच्या अर्थसहाय्याने महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेमार्फत हाती घेतले जाणार आहे.
या पुलाच्या बांधकामामुळे गार्डी व परिसरातील नागरिकांचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागणार आहे. गावकऱ्यांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला असून माजी आमदार ॲड. शहाजीबापू पाटील यांचे आभार मानले आहेत.