
पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यातील उजनी व वीर धरणातील वाढत्या पाणलोटामुळे पंढरपूरवर महापुराचे संकट आले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धरणांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.
उजनी धरणातून 1,25,000 क्सूसेक्स तर विद्युतगृहातून 1,600 क्सूसेक्स असा एकूण 1,26,600 क्सूसेक्स विसर्ग भीमा नदीत करण्यात आला आहे. तसेच वीर धरणातून नीरा नदीत होणारा विसर्ग कमी करूनही तो 46,121 क्सूसेक्स इतका आहे.
नागरिकांना सतर्कतेचा इशारा
या विसर्गामुळे भीमा व नीरा नदीकाठच्या सखल भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने सतर्क राहावे, प्रशासनाने दिलेल्या सूचनाचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.