
सांगोला/प्रतिनिधी : जीवनात प्रत्येकाच्या आनंदाच्या जागा वेगवेगळ्या असतात. प्रत्येकाची आनंदाची संकल्पना वेगवेगळी असते. माणसाने स्वतःमध्ये आनंद शोधला पाहिजे. जीवनात चिकित्सकपणे जगले पाहिजे. योग्य ठिकाणी नाही म्हणायला शिकले पाहिजे. तरुणांनी आपल्या दैनंदिन कामाच्या माध्यमातून पैसा कमवायला शिकले पाहिजे त्यातच खरा आनंद आहे. जीवनात योग्य ठिकाणी पैसा खर्च केला पाहिजे. आज माणसाकडे वेळ शिल्लक नाही हे दुर्दैव आहे. (Bank)
जगणं हे प्राथमिक ध्येय आहे. माणसाच्या जीवनात सगळं क्षणभंगुर आहे. येतानाही काही घेऊन आलो नाही, जातानाही काही घेऊन जायचं नाही. निसर्गाशी समरस होऊया. आपले कौतुक आपणच केले पाहिजे. नात्यांमध्ये प्रेम जपायला शिकले पाहिजे. पूर्वी जगण्यात मजा होती. ती आता हरवत चालली आहे. पूर्वी पत्रातून संवाद साधला जायचा पण आता पत्र व्यवहारच होत नाही याची खंत आहे. (Bank)
आई-वडिलच आपल्या जीवनात आनंद देऊ शकतात.वडिलांचे प्रेम जितकं मुलावर असते त्याहीपेक्षा मुलीवर अधिक असते. बापाला अभिमान वाटावे असे जीवन जगले पाहिजे. कुटुंबात नाती किती गोड आहेत हे आपण आपल्या कुटुंबातील आजी-आजोबा समवेत जीवन जगताना अनुभवले पाहिजे. माणसाने आनंदाने जीवन जगले पाहिजे असे मौलिक विचार महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते श्री .गणेश शिंदे यांनी सांगोला येथे व्यक्त केले.(Bank)
सांगोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या २९ व्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मृतीभवन सांगोला येथे आयोजित केलेल्या व्याख्यानाच्या कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांनी आपले विचार व्यक्त केले .(Bank)
यावेळी बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन के.एस. माळी यांनी बँकेच्या प्रगतीविषयी माहिती दिली. सांगोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू असून २९ वर्षात बँकेने नफा मिळवला आहे. बँकेकडे ठेवी व कर्ज उलाढाल 500 कोटीची आहे. बँक सामाजिक बांधिलकीतून विविध प्रकारचे उपक्रम राबवत आहे.
यावेळी चेअरमन डॉ. प्रभाकर माळी यांनी बँकेची सद्यस्थिती, बँकेची वाटचाल याविषयी माहिती दिली. कार्यक्रमासाठी बँकेचे चेअरमन , व्हा. चेअरमन, सर्व संचालक मंडळ, मान्यवर, सभासद, हितचिंतक ,ठेवीदार, उपस्थित होते. यावेळी श्रीकांतदादा देशमुख यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाहुण्यांचा परिचय ज्ञानेश्वर माळी यांनी करून दिला.