
सांगोला पोलीस स्टेशनमध्ये ७९ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.(Sangola Police)
ध्वजारोहण सोहळ्याला पोलीस अधिकारी व कर्मचारी उत्साहाने उपस्थित होते. देशभक्तीपर गीतांनी व घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. यावेळी घुगे यांनी स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व पटवून सांगितले तसेच “कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा व शिस्त या तीन गोष्टींवरच पोलीस दलाचे सामर्थ्य टिकून आहे,” असे मत व्यक्त केले.(Sangola Police)
त्यांच्या प्रेरणादायी नेतृत्वामुळे सांगोला पोलीस स्टेशन हे अनुशासन, तत्परता आणि जनसंपर्कासाठी नेहमीच आदर्श ठरत असल्याचे उपस्थितांनी गौरवोद्गार काढले. (Sangola Police)
सोहळ्याच्या शेवटी सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी देशसेवेची शपथ घेतली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. (Sangola Police)