
विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्रातील सर्व वाहनधारकांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी राज्य सरकारने ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंतची मुदत जाहीर केली आहे.(HSRP)
निर्धारित मुदतीनंतर, म्हणजेच १ डिसेंबर २०२५ पासून HSRP न बसवलेल्या वाहनांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. यामध्ये संबंधित वाहनधारकांना १००० रुपयांपासून १०,००० रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल, असे वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे.(HSRP)
HSRP बसवण्यासाठी वाहनधारकांना ऑनलाइन बुकिंग करावे लागणार असून त्यासाठी वाहनाचे RC बुक व मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. वेळेत HSRP बसवून दंडात्मक कारवाई टाळावी, असे आवाहन पोलिस विभागाने केले आहे.