
विशेष प्रतिनिधी : सांगोला इस्कॉन (आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ) तर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमी (Sri Krishna) महोत्सव २०२५ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. श्रद्धा, भक्ती आणि आनंद यांचा संगम असलेला हा उत्सव रविवार, १७ ऑगस्ट २०२५ रोजी सायं ५ ते रात्री ९, कविराज मंगल कार्यालय महूद रोड येथे साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने भाविकांसाठी खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.(Sri Krishna )
कार्यक्रमाचे ठिकाण :
श्री श्री राधा कृष्ण, इस्कॉन सांगोला कविराज मंगल कार्यालय महूद रोड (Sri Krishna )
वेळ : दुपारी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत
कार्यक्रमात विशेष आकर्षणे :
राधा-कृष्णांची सुंदर अलंकारिक पूजा
संगीतमय कीर्तन व प्रवचन
श्रीकृष्ण जन्मकथा (Sri Krishna ) व लीलांचे सादरीकरण
महाप्रसाद
भगवद्गीतेतील श्लोकाचा संदर्भ, “जो माझ्या जन्माचे आणि कर्माचे दिव्य स्वरूप जाणतो, तो मृत्यूनंतर पुनर्जन्म न घेता माझ्या धामात येतो.” या पवित्र दिवशी, प्रत्येक भाविकाने श्रीकृष्णाच्या चरणी भक्ती अर्पण करून आपले जीवन धन्य करण्याची संधी गमावू नये.(Sri Krishna )
नागरिकांना, कुटुंबासह उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.(Sri Krishna )
|| सर्व भाविकांचे इस्कॉन सांगोला परिवारातर्फे हार्दिक स्वागत ||

